ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित होणार

सरपंच सौ. सुप्रिया संतोष कदम यांनी दिली भेट

⚡कणकवली ता.२५-:
ओसरगावचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा व गावाचे अर्थकारण बदलणारा ओसरगाव तलाव पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी ओसरगावच्या नूतन सरपंच सौ. सुप्रिया संतोष कदम यांनी विजयी मिरवणुकीने सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या व गावाच्या साक्षीने ओसरगाव तलाव या ठिकाणी भेट दिली.

यावेळी भविष्यात ओसरगावच्या सर्वांगीण विकासासाठी व ओसरगाव तलाव पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी तलावाच्या ठिकाणी श्रीफळ वाढवून पाच वर्षात गावचा ताकदीने विकास करण्याचे अभिवचन दिले. याप्रसंगी सर्व कार्यकर्ते मतदार व गावचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page