गटसाधन केंद्र, कणकवली येथे दिव्यांग विदयार्थी व्यवसायीक प्रशिक्षण कार्यशाळा

⚡कणकवली ता.१६-: समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त गटशिक्षणाधिकारी व गटसमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दिवसीय एक व्यवसायीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी त्याना विविध व्यवसायपुरक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांना कॉयर बोर्ड बोर्ड, क्षेत्रीय कार्यालय, कोकण विभाग कणकवली येथे शोभेच्या विविध वस्तु बनविणे, पाय पुसनी बनविणे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यशिक दाखवून तसेच व्यवसाय सुरु करण्यासाठी भाग भांडवल व कर्ज सुविधेबाबत तसेच तयार झालेल्या मालाच्या खरेदी-विक्री संबंधी कॉयर बोर्डचे रिजनल ऑफीसर श्रीनिवास यांनी सखोल मार्गदर्शन केले.या व्यवसायिक कार्यशाळेतून
दिव्यांग विद्यार्थ्यांना फायदा होऊन त्याचे आर्थिक जीवनमान सुधारण्यात मदत होणार आहे.
या कार्यशाळेसाठी गटसाधन केंद्र, कणकवली येथील कर्मचारी भाऊसाहेब कापसे, (विशेष तज्ञ), सचिन तांबे (विषय तज्ञ), नितेश तेली, कमलेश कामतेकर, नितीन पाटील (विशेष शिक्षक) यांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page