⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकमतचे उपसंपादक अनंत जाधव यांची भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्याने आज भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी श्री जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, आदी उपस्थित होते
