⚡कणकवली ता.१६-: राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी मजीद नावलेकर, मोहीन बोबडे, तस्लिम बोबडे,जुबेर मास्के,सरफराज बट्वाले,अरमान बटवाले,महराज नवळेकर,अकबर बटवाले यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी सोबत भाजप कणकवली तालुका उपाध्यक्ष पंढरी वायगणकर,माजी पंचायत समिती सदस्य सौ.हर्षदा वाळके,माजी सरपंच श्रीमती अफ्रोजा नावलेकर,सरपंच उमेदवार भाई मोरजकर,संजय पाटील,नीरज मोरये,राजन मोरजकर,महेश लोके,पंकज आचरेकर,दयानंद हडकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
