प्रभाग ३ मधून प्रचारात उदंड प्रतिसाद; गावच्या विकासासाठी माजी सैनिक संघटना निवडणूक रिंगणात…
⚡सावंतवाडी ता.१५-: तालुक्यातील वेर्ले ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून माजी सैनिंक संघटनेकडून माजी सैनिक बाळकृष्ण यशवंत राऊळ हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. गावचा आणि आपल्या प्रभागाचा विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांची निशाणी शिट्टी आहे. बाळकृष्ण राऊळ हे माजी सैनिक असून, कारगिल युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या प्रभागात जोरदार प्रचार सुरू केला असून, प्रभागातून त्यांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
