निर्वासित, बझर, श्याम तुझी आवस इली रे नाटकांची बाजी

६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर;तिन्ही विजेते सिंधुदुर्गातील

मालवण दि प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी केंद्रावर घेण्यात आलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेत युथ फोरम, देवगड या संस्थेच्या निर्वासित या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर या स्पर्धेत अखील भारतीय मराठी नाटय परिषद, मालवण या संस्थेच्या बझर या नाटकाने द्वितीय क्रमांक आणि स्वराध्या फाऊंडेशन, मालवण या संस्थेच्या श्याम तुझी आवस इली रे या नाटकाने तृतीय क्रमांक मिळविला आहे या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मालवण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल पुढील प्रमाणे-

दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक स्वप्नील जाधव (नाटक- निर्वासित), द्वितीय पारितोषिक अभय कदम (नाटक-बझर), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-निर्वासित), द्वितीय पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- बझर), नेपथ्य प्रथम पारितोषिक अभय वालावलकर (नाटक- बत्ताशी), द्वितीय पारितोषिक सचीन गांवकर (नाटक-निर्वासित, रंगभूषा प्रथम पारितोषिक सावानी पराडकर नाटक-संकासूरा हे महावीरा), द्वितीय पारितोषिक आदिती दळवी (नाटक- बत्ताशी १९४७) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रफुल्ल घाग (नाटक-निर्वासित) व शुभदा टिकम (नाटक बझर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र प्राजक्ता वाडये (नाटक-भिंती) योगिता सावंत (नाटक-श्याम तुझी आवस ईली रे), किती चव्हाण नाटक या व्याकुळ संध्यासमयी , भाग्यश्री पाणे (नाटक ए. आपण चहा घ्यायचा का ?) सीमा मराठे (नाटक ऋणानुबंध), योगेश जळवी (नाटक- मधुमाया), प्रसाद करंगुटकर (नाटक- खरं सांगायचं तर), प्रसाद खानोलकर (नाटक- पासर-पॉन), कृष्णकांत साळवी (नाटक- मावळतीचा इंद्रधनु) दीपक माणगांवकर (नाटक- मडवॉक)

दि. १५ नोव्हेंबर २०१२ ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत मामा वरेरकर नाटयगृह, मालवण व स्वा. विनायक दामोदर सावरकर नाटयगृह, रत्नागिरी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २५ प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. सतिश शेंडे, श्रीमती मानसी राणे आणि श्री. ईश्वर जगताप यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page