⚡मालवण ता.१४-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे साने गुरुजी जन्मदिनानिमित्त कथाकथन व गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेची सुरुवात सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात झाली. संस्थेचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिटो यांच्या हस्ते साने गुरुजीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. वैष्णवी आचरेकर, पंढरी सावंत, सोनाली कोलकर, सोनाली वस्त यांनी प्रार्थना सादर केली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- विभाग पहिला- बालवाडी कथाकथन प्रथम-श्लोक नीलेश सामंत (शिशुविहार- काळे आजींची बालवाडी), द्वितीय- ऋग्वेदी रामचंद्र चव्हाण (शिशुविहार – काळे आजींची बालवाडी), तृतीय-योहान रोशन सावंत (बालविकास प्रकल्प, सेवांगण), उत्तेजनार्थ -अवनिश विनित देशपांडे (देऊळवाडा अंगणवाडी), गीतगायन प्रथम- कावेरी गौरव बिलये (देऊळवाडा अंगणवाडी), द्वितीय- अहिल्या सचिन चव्हाण (देऊळवाडा अंगणवाडी), तृतीय- तपस्या सागर गोलतकर (सीताबाई घुर्ये प्री. प्रायमरी), उत्तेजनार्थ-त्रिशा संतोष खराडे (भंडारी हायस्कूल बालवाडी).
विभाग दुसरा – पहिली ते दुसरी कथाकथन प्रथम- अनुजा रामेश्वर माटे (आचरा पिरावाडी), द्वितीय-स्वरा सदाशिव चव्हाण (जि. प. शाळा देवली), तृतीय- प्रिन्स जयवंत तारी (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल), उत्तेजनार्थ – मीत प्रशांत गोरुले (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा), गीतगायन स्पर्धा – प्रथम रिषभ गणेश मयेकर (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा), द्वितीय कृपा केदार साळगावकर (भंडारी प्राथमिक शाळा), तृतीय- प्रतिक्षा भालचंद्र मणचेकर (प्रा. शाळा धुरीवाडा), उत्तेजनार्थ- रुही गणेश मयेकर (मोहनराव परुळेकर (प्राथमिक शाळा).
विभाग तिसरा- तिसरी ते चौथी कथाकथन स्पर्धा – प्रथम नाविन्य सचिन डोळस (मसुरे देऊळवाडा शाळा), द्वितीय- उर्वी विनोद आचरेकर (आचरा पिरावाडी), तृतीय- वैष्णवी उदय परब (आचरे डोंगरेवाडी), उत्तेजनार्थ- सोहम समीर गवाणकर (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा), गीतगायन प्रथम-गौरी राजन वस्त (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा), द्वितीय- मीरा संजय वराडकर (जय गणेश इंग्लिश स्कूल), तृतीय- दुर्वा महेंद्र पराडकर (भंडारी प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ- समीक्षा तोतरे (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा.)
विभाग चौथा – पाचवी ते सातवी कथाकथन स्पर्धा- प्रथम- रोशन कैलास साळुंके (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय- गौरी रत्नाकर उदगिरे (आचरा पिरावाडी), तृतीय- अस्मी अशोक आठलेकर (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ- स्नेहल मंदार घाडी (आचरा नं. १), गीतगायन-प्रथम- स्वरा अनिरुद्ध आचरेकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), द्वितीय- वैदिका परशुराम लुडबे (रेकोबा विद्यालय), तृतीय- कार्तिकी संजय बिरमोळे (टोपीवाला हायस्कुल), उत्तेजनार्थ- मृण्मयी सदाशिव आरोलकर (टोपीवाला हायस्कुल).
विभाग पाचवा- आठवी ते दहावी कथाकथन प्रथम-आर्यन देवीदास प्रभूगावकर (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय- कैवल्य सागर मिसाळ (टोपीवाला हायस्कृल), तृतीय-संचिता महादेव बागडे (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), उतेजनार्थ- वेदांत शिवप्रसाद नाईक (टोपीवाला हायस्कूल), गीतगायन स्पर्धा- प्रथम- भूमी आशिष नाबर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), द्वितीय- सुशिल दतात्रय प्रभु- केळूसकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय- आर्या अनिरुद्ध आचरेकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), उत्तेजनार्थ- वैष्णवी दत्ताराम सावंत (आर. पी. बागवे हायस्कूल).
स्पर्धेचा पारितोषिक वितरण मान्यवर, परीक्षक, संस्थेचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, श्री.चव्हाण सर, सेवांगणचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते झाले. बालवाडी गटाच्या स्पर्धेसाठी अभय कदम यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या उपक्रमाची माहिती लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी दिली. परीक्षण प्रथमेश सामंत, मनाली वेंगुर्लेकर, मैत्रेयी बांदेकर, विद्या तळाशिलकर, रविना पाजरी, प्रतिक कोतिवडेकर, ऋतू गोवेकर, आस्था आचरेकर, मनोजकुमार गिरकर, विजय कुडाळकर यांनी केले. कार्यक्रम व्यवस्था संजयकुमार रोगे, सोनाली वस्त, सेवांगण कर्मचारी यांनी पाहिली. सूत्रसंचालन ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले.
