रोटरी क्लब मालवणतर्फे वायरी भूतनाथ शाळेला साऊंड सिस्टीम संच प्रदान

⚡मालवण ता.१४-: वायरी भूतनाथ शाळा नं. १ च्या मागणीनुसार मालवण रोटरी क्लब तर्फे शाळेला साऊंड सिस्टीम संच प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रो. रतन पांगे यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापक सौ. देऊलकर यांच्याकडे संच सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी क्लबचे सचिव अभय कदम, माजी अध्यक्ष उमेश सांगोडकर, खजिनदार रमाकांत वाक्कर, सुहास ओरसकर, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ श्री. वराडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताराम मालवणकर, शाळा व्यवस्थापन समिती युवा प्रतिनिधी प्रदीप वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक यांच उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ. पाडगावकर यांनी केले तर स्वागत आणि आभारप्रदर्शन सौ. देऊलकर यांनी केले.

You cannot copy content of this page