सामंत ट्रस्टच्यावतीने डॉ जयेंद्र परुळेकर यांनी दिला धनादेश
⚡सावंतवाडी ता.१४-: येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते वाडोस येथील महिमा म्हाडगुत या कॅन्सरग्रस्त गरजू महिलेला सामंत ट्रस्ट तर्फे आज दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
दरम्यान महिमा म्हाडगुत यांना स्तनांचा कर्करोग असून त्यांची किमोथेरपी चालू आहे.नजिकच्या काळात अशा अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येईल असे डॉ परूळेकर यांनी सांगितले.
