विभागीय थ्रो बॉल स्पर्धांना सुरुवात

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आजपासून येथील क्रीडा संकुलात विभागीय थ्रो बॉल स्पर्धांना सुरुवात झाली. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नाणेफेक करुन स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले.

14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील विद्यार्थी- विद्यार्थीनी खेळाडूंच्या यास्पर्धा होत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तालूका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन करुन सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, कोल्हापूर थ्रो बॉल संघटनेचे अध्यक्ष दशरथ माने, महाराष्ट्र थ्रो बॉल संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, सहसचिव सुरेश हादीमनी, सिंधुदुर्ग थ्रो बॉल संघटनेचे सचिव सुनिल भाटीवडेकर, कोल्हापूर थ्रो बॉलचे संचालक भरत कुंभार, थ्रो बॉल संघटनेचे अध्यक्ष अजय शिंदे उपस्थित होते.

You cannot copy content of this page