उद्यापासून बाजारपेठेत फळ विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मनाई

वाहतूक कोंडी होत असल्याने नगर पालिकेचा निर्णय;नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड वसूल करण्याचा इशारा

⚡सावंतवाडी ता.१४-: येथील बाजारपेठेत मार्गशीर्ष महिन्या निमित्त फळ विक्रेत्यांना बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला दुकान लावण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु काही फळ विक्रेते मोठमोठी दुकाने थाटु लागल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत आजचाच दिवस दुकान लावण्यास परवानगी देण्यात येत आहे. उद्यापासून जर ही दुकानं पुन्हा दिसल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच दंड देखील आकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page