बाजी कोण मारणार ? राजकीय विश्लेषकांचे लागलेय लक्ष
⚡सावंतवाडी ता.१४-: माजगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा -बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत होत आहे .या दुरंगी लढतीत भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संजू परब आणि शिवसेनेचे विक्रांत सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संजू परब आणि विक्रांत सावंत यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते .परंतु चुरशीच्या निवडणुकीत विक्रांत सावंत यांनी बाजी मारली .ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला. आता पुन्हा दोघे आमने सामने आले असुन यात कोण बाजी मारतो याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे.
गेल्या निवडणुकीत विक्रांत सावंत यांना सध्याचे बाळासाहेबाची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची साथ होती. मात्र यावेळी अशोक दळवी भाजपाच्या बाजूने आहेत .तसेच जि.प. माजी अध्यक्षा रेश्मा सावंत ,माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत हे भाजपच्या उमेदवाराच्या साथीला आहेत .दळवी जिल्हाप्रमुख असूनही येथे भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. याउलट विक्रांत सावंत यांच्या साथीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, विद्यमान सरपंच दिनेश सावंत ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत तसेच कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे माजगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अटीतटीची लढत होत आहे .
या लढतीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष आहे येथे .भाजपच्या सरपंच पदासाठी उमेदवार अर्चना सावंत तर शिवसेनेच्या उमेदवार संजना सावंत सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत.
