रविंद्रनाथ मुसळे यांचा मृत्यूप्रकरणी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

न.पं. विरोधी गटनेते सुशांत नाईक,कन्हैया पारकर यांची मागणी

⚡कणकवली ता.१२-: कणकवली नगरपंचायतच्यावतीने गटाराचे काम करताना राज्य मार्ग नरडवे रोड वर १२ फुट खोलीचे गटार खोदण्यात आले. त्यात काल सायंकाळी ठेकेदाराने काळजी न घेतल्यामुळे रविंद्रनाथ मुसळे हे ज्येष्ठ नागरिक अपघात होऊन पडले.त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत नगरपंचात प्रशासन व सबंधित ठेकेदार दोषी असून त्यांच्यावर मनुषवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी नगरपंचायत विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर,नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी केली आहे.
कणकवली येथील नरडवे रोडवरील ज्या ठिकाणी रवींद्रनाथ मुसळे यांना अपघात झाला त्याठिकाणी युवा सेना जिल्हाप्रमुख नगरपंचायत विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर,नगरसेवक रुपेश नार्वेकर
यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, कणकवली युवा तालुका समन्वयक तेजस राणे,कणकवली शहर प्रमुख उमेश वाळके, महेश राणे, संतोष राणे आदींसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी पाहणी केली व संबंधित काम सुरू असताना ठेकेदाराने हलगर्जीपणा दाखविल्याने अपघात झाल्याचे सांगितले.

गेले काही दिवस गटार खोदाईचे काम सुरु आहे. नरडवे रस्त्यावरून हे गटार जात असल्याने रस्ता देखील खोदण्यात आला आहे. मात्र या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. अथवा बॅरीकेट देखील लावले नाहीत.या हलगर्जीपणामुळे कणकवली भालचंद्र नगर येथील रविंद्रनाथ वसंत मुसळे (वय ६९ ) हे रविवारी नरडवे रत्यावरून दुचाकीने जात असताना खोदलेल्या गटाराचा त्यांना अंदाज न आल्याने गटारात पडून ते गंभीर जखमी झाले. या अपघाताची सखोल चौकशी व्हावी,मुसळे कुटुंबीयांना नगरपंचायत प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे.

कणकवली नगरपंचायतमध्ये ठेकेदार मोकाटपणे काम करत आहे. आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रविंद्रनाथ मुसळे यांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे.त्यामुळे या दोषी असलेल्यांची सखोल चौकशीकरून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी केली आहे. यासंदर्भात आपण पोलिसांकडे तक्रार करण्याबरोबरच मुख्याधिकारी यांचेही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले

You cannot copy content of this page