अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मळगाव शाखा अध्यक्षपदी सुनील राऊळ…

सचिव पदी हरिश्चंद्र आसयेकर

*💫सावंतवाडी दि.०७-:* अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मळगाव शाखा अध्यक्षपदी सुनील राऊळ यांची तर सचिवपदी हरिश्चंद्र आसयेकर यांची निवड करण्यात आली. सकल मराठा समाज मळगाव यांच्यावतीने मराठा बांधवावर होणारे अन्याय व न्याय हक्कासाठी गावपातळीवर संघटना गठीत करण्यात आली असून सकल मराठा समाजाच्या सर्वसाधारण सभेत सकल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सूहास सावंत यांच्या प्रमुख उपस्थीतीत व तालुकाध्यक्ष सीताराम गावङे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेस हि निवङ सर्वानुमते करण्यात आली. तर कार्यकारणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्ष एकनाथ गावङे, प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ गावकर, सदस्य सुधीर राऊळ, समिर परब, निलेश चव्हाण, तुषार सावंत, प्रकाश नागेश राऊळ, रितेश राऊळ, सुरज राऊळ, स्नेहल जामदार, निकीता राऊळ याची निवङ झाली. नूतन संघटना पदाधिकार्‍यांंचे सकल मराठा बांधवानी अभिनंदन केले. सकल मराठा बांधावाच्या समस्यांबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही अध्यक्ष यांनी दिली. जिल्हाध्यक्ष सावंत व तालुकाध्यक्ष गावङे तसेच जेष्ठ पत्रकार अभिमन्यु लोंढे यांनी मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. ग्रामिण पातळीवरील अशा शाखा स्थापन करुन सकल मराठा समाजाला एकाछताखाली आणण्याचा धोरण आहे. याबाबत सविस्तर माहीती दिली. प्रस्तावित गुरु गावकर यांनी तर आभार हरिश्चंद्र आसयेकर यांनी मानले .

You cannot copy content of this page