कणकवली कॉलेज च्या विकासासाठी एकत्र येऊन कार्य करूया

महासंघाचे मुख्य प्रवर्तक ऍड. उमेश सावंत यांचे आवाहन

*💫कणकवली दि.०७-:* कोणतेही वैयक्तिक आमंत्रण नसताना केवळ मी कणकवली कॉलजचा विद्यार्थी आहे . या आत्मियतेच्या भावनेने आज येथे एवढ्या संख्येने तुम्ही एकत्र आलात . आज बीज रोवले आहे . त्याचे वटवृक्षात रुपांतर करूया . इतक्या वर्षात खरं तर आधीच व्हायला हवे होते . परंतु आमची इच्छाशक्ती अनंत आहे . म्हणूनच माजी विद्यार्थ्यांचा महासंघ स्थापन होत आहे . कणकवली कॉलेज हा दुवा मानून आतापर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महान कार्य करूया , असे आवाहन महासंघाचे मुख्य प्रवर्तक ऍड . उमेश सावंत यांनी येथे केले. कणकवली कॉलेजच्या आतापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने माजी विद्यार्थी महासंघ स्थापन करण्याच्यादृष्टीने माजी विद्यार्थ्यांची सहविचार सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती . प्रारंभी कॉलेज मैदानावरील श्री देव शिवारा मंदिरात गाहाणे चालण्यात आले . त्यानंतर कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात अॅड . उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली . यावेळी प्राचार्य डॉ . राजेंद्र चौगुले , प्रा . मंगलदास कांबळे , अमोल खानोलकर , अभय साडपकर , प्रा . हरिभाऊ मिसे , राजन पारकर , मंदार सापळे . स्वानील वळंजू संजय मालंडकर , लक्ष्मीकांत मावे आदी उपस्थित होते . प्रारंभी कणकवली कॉलेजच्या वाटचालीतील माजी आम . के केशवराव राणेचा नामोल्लेख करून दिवंगत विद्यार्थी , शिक्षक , संचालक आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली . प्रा . मिसे व अभय खडपकर यांनी प्रास्ताविकात महासंघ स्थापन करायामागची उद्दीष्ट , कार्य , घाटनेत काय अपेक्षित आहे . याबाबत मार्गदर्शन केले . अँड . सावंत पुढे म्हणाले , या कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी मोठ मोठ्या प्रशासकीय , राजकीय पदावर पोहोचले आहेत . आज माझ्यापेक्षा ज्येष्ट विद्यार्थी येथे उपस्थित असतानाही मला या अध्यक्षपदाचा मान घेताना आनंद होत आहे . राजकीय क्षेत्रापासून हा महासंघ अलिप्त असला तरी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या अनुभवाचा , त्यांचा मार्गदर्शनाचा आपण लाम घेऊया , आपापसात मदत करून ही माजी विद्याथ्र्यांची मोट पुढे नेण्यासाठी कॉलेजचा दुवा वापरून सर्वांनी एकत्रित येऊया प्राचार्य डॉ . चौगुले म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्लयातील १५ कॉलेजच्या परीक्षा कणकवली कॉलेजमधून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या . जिल्लयातील दोन कॉलेजमधील हे एक लीड कॉलेज आहे . कॉलेजच्या आवारातील २५ राऊटरद्वारे विद्याथ्यांना ऑनलाईन शिक्षण , परीक्षा देण्याचे काम या कॉलेजने केले . २०२३ – २४ मध्ये नॅक समिती येईल . त्यावेळी या महासंघाला मिळालेला प्रतिसाद पहाता कॉलेजचे नाव निश्चितच आणखी पुढे जाईल . यात शंका नाही अमोल खानोलकर यांनी संस्था नोंदणी करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे . सदस्य कोण होईल याबाबत मार्गदर्शन करून विचार मांडण्याचे जावाहन केले . यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध सूचना केल्या . यात प्रवीण पारकर यांनी वृद्धांसाठीही उपक्रम राब्या अशी सूचना केली . तसेच सांस्कृतिक प्रबोधन करा , महिला सक्षमीकरण करा , कलाकार घडवा अक्तिमत्व विकास प्या , स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घ्या , मुलाना इटर्नशीपसारखे प्रॅक्टिकल ज्ञान द्या , मालवणी भाषेला प्राधान्य नुकतेच नेपाळला अंडा रोवणाऱ्या गौरव राणेसारख्या विद्यार्थ्याना आयकॉन बनवा आदी अनेक सूचना करण्यात आल्या . यात माई परब , बांदेकर , अनंत हजारे , उपपणा मोर्ये , अँड . विलास परब , प्रियांका लोकरे , डॉ . गाइ , सुशिल सावत , शैली सावंत , संजय राणे , सुहास वरुणकर , राजेंद्र वर्ण , कन्हैया पारकर , बंडू हर्णे , पांडू रासम आदी अनेकानी सहभाग घेतला . प्रा . प्रमोद कोरगांवकर यांनी महासंघाच्या कामात सातत्य रहावे . महासंघाचा सदस्य करताना तो माजी विद्यार्थी कॉलेजसाठी काय योगदान देऊ शकतो , याचीही नोंद ठेवावी , अशी सूचना केली . यावळी आजीच सभासद , सर्वसाधारण सभासद शुल्क किती ठेवावे याबाबत चर्चा करण्यात आली . माजी विद्यार्थ्यांच्या महासपाची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल , असे सांगण्यात आले . प्रा . भिसे यांनी आभार मानले .

You cannot copy content of this page