राणे महाराष्ट्राचे दबंग नेते,…

झोप विसरून मेहनत करतात;फडणवीसांची स्तुतीसुमनं

*💫ओरोस दि०७-:*: माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं. सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होतं. 650 हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

You cannot copy content of this page