मोदी सरकारचा वैद्यकीय सेवावर भर

केंद्रीय मंत्री अमित शहा : राणेमुळे युवकांना रोजगार

*💫ओरोस दि.०७-:* महाराष्ट्र भूमीला स्पर्श करून आपण धन्य झालो असल्याचे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. या भुमिकडे पाहून लढण्याची प्रेरणा मिळते असे देखील ते म्हणाले आहेत. महाराष्ट्राने देशाला स्वदेशी संस्कार दिले असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं असे ते यावेळी म्हणाले आहेत. यावेळी नारायण राणे यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष केला आहे. त्यामुळे आमच्या पक्षात राणेंवर अन्याय होणार नाही, त्यांना न्याय मिळेल असे अमित शहा म्हणाले आहेत. राणे गरिबांसाठी लढण्यात नेहमी पुढे असतात. सिंधुदुर्गात त्यांच्याचमुळे मोठे विकास होत असून युवकांना रोजगार मिळत आहेत. तसेच मोदी सरकार वैद्यकीय सेवावर भर देत असल्याचे पण त्यांनी राणे यांच्या मेडिकल कॉलेज उद्घाटन प्रसंगी बोलताना स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page