Headlines

सावंतवाडीत तहसीलदार निवासस्थानाजवळ झाड कोसळले…

क्रेटा कार व शेडचे नुकसान, मोठा अनर्थ टळला..

⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील खासकीलवाडा तहसीलदार निवासस्थानाजवळ झाड कोसळले. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून यात कारचे नुकसान झाले आहे.

आज सायंकाळी पावसानं जोर धरला होता. यावेळी तहसीलदार निवासस्थानाजवळी हे झाड कोसळले. सुदैवाने यात कोणाला हानी झाली नसली तरी येथे पार्क केलेली क्रेटा कार व पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच हे झाड हटविण्यासाठी कर्मचारी दाखल झाले.

You cannot copy content of this page