Headlines

मालवणात आल्यावर प्रेरणा व प्रोत्साहन मिळते…

नारायण राणे:कार्यकर्त्यांनी अभ्यासू वृत्ती जोपासावी…

⚡मालवण ता.२४-: “राजकारणात आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी अनेक पदे भूषवली, मात्र माझ्यात कोणताही बदल झालेला नाही. मी आजही सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा सेवक आहे. कार्यकर्त्यांनी पदाचा गर्व न बाळगता अभ्यासपूर्वक काम करत जनतेची सेवा करावी,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले.
मालवण दौऱ्यावर आलेल्या खासदार राणे यांनी महायुती कार्यालय तसेच भाजप कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुती कार्यालयात नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, मेघा सावंत, उमेश नेरुरकर, संतोष साटविलकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, सिद्धार्थ जाधव, भाई मांजरेकर, शेखर पेणकर, अभय कदम, राजू बिडये, मंदार लुडबे, जॉन नरोना, महेश सारंग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी खासदार राणे यांचे स्वागत केले. यावेळी विलास हडकर, महेश मांजरेकर, पंकज सादये, अन्वेषा आचरेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, डॉ. मिलिंद कुलकर्णी, क्षमा हडकर, श्याम झाड, अमृता फाटक, महिमा मयेकर, दीपक सुर्वे, अशोक तोडणकर, मनोज मेथर, केदार झाड, जयराम कांबळी, संदीप हडकर, महेंद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार राणे म्हणाले की, “मालवण हा मतदारसंघ माझ्यासाठी अतिशय शुभ असून येथे आल्यावर नेहमी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. लोकांची मदत करणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे हीच माझी कार्यपद्धती आहे. माझ्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच माझी प्रामाणिक इच्छा असून त्यासाठीच मी राजकारणात सक्रिय राहिलो आहे.”
कार्यकर्त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “वाचन आणि अभ्यासामुळे कामाला दिशा मिळते. कार्यकर्त्यांनी अभ्यासू वृत्ती, संयम आणि लोकाभिमुख दृष्टिकोन जोपासला पाहिजे,” असे ते म्हणाले.
पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आगामी काळात आमदार, खासदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. “मी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. कोणत्याही वेळी हाक दिल्यास मदतीसाठी तत्पर राहीन,” अशी ग्वाही देत त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page