Headlines

“एक पेड स्कुल के नाम'”कोलगाव केंद्रप्रमुखांचा अनोखा उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.२४-: कोलगाव केंद्रात दिनांक २४ जून रोजी शिक्षण परिषदेचे औचित्य साधून कोलगाव, चे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे यांनी केंद्रातील सर्व शाळांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करून “एक पेड स्कुल के नाम” हा अनोखा उपक्रम राबविला.

नुकत्याच विभागीय स्पर्धा परीक्षेतून नवनियुक्त झालेले कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. निऊंगरे यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांना फळझाडांची रोपे वाटून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व कृतीतून विषद केले.

याप्रसंगी डायट सिंधुदुर्गशी संलग्न असलेले ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे कोऑर्डीनेटर प्रशांत भोसले , कोलगाव केंद्र मुख्याध्यापिका मृगाली पालव,सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यावेळीउपस्थित होते.

त्यांच्या या उपक्रमाचे केंद्रातील सर्व शिक्षकांनी कौतुक केले.

You cannot copy content of this page