*मुख्यमंत्री पदाचे वचन दिले असते तर नक्कीच पाळले असते

गृहमंत्री अमित शहा यांचा घणाघात

*💫ओरोस दि.०७-:* सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले असून हे तीन चाकांचे ओटो रिक्षा सरकार असल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची कोणतेही आश्वासन आपण दिलेले नव्हते असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे. फक्त सत्तेच्या लालसेपोटी जनदेशाचा अनादर करून महविकास आघाडी सरकार सत्य झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे. नितिष कुमार ला मुख्यमंत्री पदाचे वचन दिले त्यांनी पाहिले तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे वचन दिले असते तर नक्कीच पाहिले असते असे स्पष्टीकरण त्यांनी दीड वर्षानंतर प्रथमच केले आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकार संपूर्ण अपयशी ठरले आहे. जनादेशाचा सादर केल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने त्यांना जागा दाखवली असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. राज्यातील ऑटोरिक्षा सरकारचे तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचेही यावेळी म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page