शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा

*खासदार नारायण राणे यांची सेनेवर जोरदार टीका

*💫ओरोस दि.०७-:* मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलवण्या मागे वेगळी भावना असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी बोलताना व्यक्त केले आहे. या कॉलेजमधील प्राध्यापक विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण देतील आणि विद्यार्थी देखील ते आत्मीयतेने ग्रहण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेनेवर टीका करत येथे विमानतळाच उद्घाटन ठरत नाही आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ला ९०० कोटी जाहीर करून दिशाभूल करत असल्याची टीका केली असून, शिवसेना नेहमी विकासाला विरोध करते असा टोला लगावला असून, शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page