मालवण दि प्रतिनिधी
मसुरे देऊळवाडा येथील स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी उत्सव २७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता स्वामींच्या पादूकांची विधीवत पूजा-अर्चा, १० वाजता महाआरती व स्थानिकांचे भजन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भरतेश्वर मंदिर येथे सत्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद, रात्री १० वाजता भरतेश्वर नाट्य मंडळाचा ‘तुला काय हवंय?’ हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
