⚡मालवण ता.२६-: पर्यटन व्यावसायिक महासंघ व मातृत्व वरदान फाऊंडेशनच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्यातील होम स्टे, कृषी पर्यटन प्रकल्प हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पर्यटकांच्या आदरातिथ्य करत असताना मालवणी जेवणाच्या आस्वादा सोबत पंजाबी, हैद्राबादी, कोल्हापुरी जेवणाच्या आस्वाद देता यावा यासाठी व्यावसायिकांसाठी दि. २९ व ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ वेळेत रॉयल ओशन बीच रिसॉर्ट तारकर्ली येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये तयार ग्रेव्हीच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत डिश बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी शेफ के. प्रसन्ना उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मे. वैष्णवी न्यूट्री फूड प्रा.लि स्वीकारले असून सदर कार्यक्रमासासाठी जास्तीत जास्त पर्यटन व्यवसायिकांनी प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा. ज्यांना यांसाठी नाव नोंदणी करायची असेल त्यांनी मोबा नं ८२७५६६३९९९ या ठिकाणी नाव नोंदणी करावी, असे आवाहन मातृत्व वरदान फाऊंडेशन, जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.
