ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक सावंतवाडीत संपन्न..
सावंतवाडी : आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी आर. पी. डी. हायस्कुल येथे काँग्रेस राष्ट्रवादी- काँग्रेस, आणि शिवसेना यांच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. यापुढे ग्रामपंचायती व इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवायचे निश्चित करण्यात आले.
जास्तीत जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आणण्याचे ठरवण्यात आले. सदरची सभा ही समन्वय समितिचे प्रमुख श्री इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या सौ – अर्चनाताई घारे, काँग्रस पक्षाचे विकासभाई सावन, दिलीप नार्वेकर, शिवसेनेचे बाळा गावडे, चंद्रकांत कासार, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक हढवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंह सांगेलकर, मायकल डिसोजा, चंद्रशेखर जोशी, रविन्द्र म्हापसेकर, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
