*💫वेंगुर्ला दि.०५-:* सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, वेंगुर्ला शाखेच्या अध्यक्षपदी प्रेमानंद जाधव, सचिवपदी जयंत जाधव तर कार्याध्यक्षपदी विठ्ठल जाधव यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा वेंगुर्ला तालुक्याची विशेष सभा वेंगुर्ला तालुका अध्यक्ष भिवा कृष्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेस अनेक विषयांवर चर्चा होऊन नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष-प्रेमानंद जाधव, उपाध्यक्ष-गजानन जाधव, राघोबा जाधव, सचिव-जयंत जाधव, सहसचिव-गुरुनाथ आडेलकर, खजिनदार -सखाराम जाधव, कार्याध्यक्ष-विठ्ठल जाधव, सदस्य-भिवा जाधव, रामचंद्र जाधव, वामन कांबळे, यशवंत कदम, दामोदर जाधव, सल्लागार-एकनाथ जाधव, मिलिद वेंगुर्लेकर यांचा समावेश आहे. भिवा जाधव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करुन नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष प्रेमानंद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
बौद्ध हितवर्धक शाखेच्या अध्यक्षपदी प्रेमानंद जाधव….
