कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण,कौटुंबिक स्नेहमेळावा १० फेब्रुवारीला

कणकवली : तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन २०२०-२१ चे पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी बैठक पार पडली.या बैठकीत कार्यक्रमाचे अंतिम नियोजन करण्यात आले.या बैठकीत सहकार कार्यकर्ता पुरस्कार ,खरेदी विक्री संघ कणकवली चेअरमन विठ्ठल देसाई यांना देण्याचे ठरविण्यात आले.तसेच पत्रकार संघ पुरस्कार,कौटुंबिक स्नेहमेळाव्यात सकाळच्या सत्रात पुरस्कार वितरण व दुपारनंतर होम मिनिस्टर स्पर्धा अर्थात ” खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम महिलांसाठी होणार आहे.तर पुरुषांसाठी संगीत खुर्ची हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार गणपत उर्फ भाई चव्हाण,शशी तायशेट्ये स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वीरेंद्र चिंदरकर,अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार फोंडघाटचे पत्रकार कुमार नाडकर्णी यांना तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार कनेडी येथील पत्रकार संजोग सावंत व तसेच पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी खारेपाटण येथील उद्योजक रफिक नाईक तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार कसवण- प्रशांत सावंत यांना या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.त्यामध्ये कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार ,कणकवलीचे महसूल मंडळ अधिकारी संतोष नागावकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडांग तसेच कोरोना कालावधीमध्ये गर्भवती असतानाही गृह भेटीतून घराघरात जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या वागदे गावातील आशा सेविका श्रद्धा गावडे, कणकवली शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सदैव कार्यरत नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड यांचा गौरव केला जाणार आहे,तरी सर्व पत्रकारांनी आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,सचिव नितीन सावंत,खजिनदार माणिक सावंत व कार्यकारी मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page