*💫सावंतवाडी दि.०५-:* शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन सुधाताई वामनराव कामत मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या वतीने एक तरी झाड लावा असा संदेश देत परिसरातील महिलांना तुळशी रोप देऊन हळदीकुंकू साजरा केला. तुळशी रोपाचे आगळेवेगळे वाण देऊन पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभामध्ये प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी खानोलकर भक्ती फाले चैत्राली गवस गौरी सावंत साक्षी कर्पे प्रियंका तुळसुलकर नेहा पटेल प्रिया केसरकर राधिका मुंज प्रांजल मेस्त्री तसेच अंगणवाडीतील छोटी बालके कु गरिमा सावंत तीर्थना सावंत राज मुंज तनिष मेस्त्री साईश कर्पे वैभवी तुळसुळकर याशिवाय अंगणवाडीसेविका अनुराधा पवार मदतनीस अमिषा सासोलकर यांनी याकामी परिश्रम घेतले यावेळी शाळेमध्ये सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती तर तीन वर्षे छोट्या बालकांनी सहभाग घेतला होता
सावंतवाडी माठेवाडा येथे तुळशी रोप हळदी कुंकवाचे वाण देऊन केला साजरा….
