होडी व्यावसायिकांनी मानले उद्योजक सागर वाडकर यांचे आभार

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गाईड आणि होडी व्यावसायिकांना टी शर्ट व कॅप चे वाटप

मालवण दि प्रतिनिधी उद्योजक सागर वाडकर यांनी कोरोना काळात सातत्याने सामाजिक भान जोपासले आहे. वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गाईड आणि होडी व्यावसायिकांना १०० टी शर्ट आणि कॅपचे वाटप करण्यात आले. होडी व्यावसायिकांनी वाडकरांचे आभार मानले. वाडकर आणि केणी यांनी यापूर्वी मालवणात ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे आणि तहसील, कार्यालयात पीपीई किट आणि मास्क वाटप केले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचा विचार करून किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेला मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गाईड सेवा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींना वाडकर आणि केणी यांनी दोन टप्प्यात टी शर्ट आणि कॅप उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी संतोष कुराडे, प्रदीप उगले, बाबू वाघ, नामदेव पोटले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page