वागदे गावातील सोशल क्लब बंद करावा

ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

*💫कणकवली दि.०५-:* कणकवली शहरालगत वागदे गावात नव्याने सुरू झालेल्या सोशल क्लब ला वागदे ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत गावातील हा क्लब बंद करण्यासाठी एकजूट केली आहे. सोशल क्लब बंद करावा असे निवेदन थेट जिल्हाधिकारी, एसपी , सहाय्यक धर्मादाय आयुक्त, डीवायएसपी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनाना दिले आहे. या निवेदनात वागदे सरपंच यांनी म्हटले आहे की वागदे गावात राष्ट्रीय महामार्गलगत नुकताच सोशल क्लब सुरू करण्यात आला आहे. या क्लबमध्ये कॅरम, बुद्धिबळ, रमी, पाच तीन दोन, मेंडीकोट, सात आठ, नोट ऍट होम, टेबल टेनिस वगैरे खेळ खेळवले जाणार आहेत. या क्लबमुळे गावातील तरुण पिढी बरबाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वागदे गावातील महिलांचा आणि ग्रामस्थांचा या सोशल क्लबला विरोध आहे. सोशल क्लब जरी असला तरी तिथे जुगारसदृश्य खेळ खेळला जातो. सोशल क्लब मुळे परिसरात अनैतिक धंदे सुरू होण्याची भीती आहे. वादविवाद होऊन गावातील शांतता बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वागदे गावातील सोशल क्लब बंद करण्याच्या मागणीचे निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक धुमाळ याना सरपंच पूजा घाडीगांवकर यांनी दिले आहे. यावेळी उपसरपंच रुपेश आमडोसकर, ग्रा.पं. सदस्य ललित घाडीगांवकर, रवींद्र गावडे, दिलीप घाडीगांवकर, शिरीष घाडीगांवकर, सुनील गोसावी, विलास कदम, बाळा आर्डेकर, गणपत घाडीगांवकर, शरद सरंगले, प्रमोद पाताडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page