ही स्टंटबाजी नाही तर जनतेचा उद्रेक…

स्टंटबाजी करणाऱ्यांना जनतेचा उद्रेक काय समजणार; विशाल सावंत यांचा अमित परब यांना टोला

*💫सावंतवाडी दि.०५-:* शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभर आज करण्यात आलेले आंदोलन स्टंटबाजी नसून जनतेचा उद्रेक आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांना जनतेचा उद्रेक काय समजणार असा टोला विशाल सावंत यांनी ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांना लगावला आहे. अमित परब यांनी प्रथम आपली ग्रामपंचायत सांभाळावी शिवसेनेला शिकवू नये अन्यथा पुढच्या टर्मला तुमचे वांदे होतील असा चिमटा त्यानी काढला आहे. राज्य सरकार हे लोकांच्या हिताचे सरकार असून, लोकांच्या हिताचाच विचार करते असे ते म्हणाले आहेत. तसेच नगरपालिका निवडणुकांना ७ महिने राहिले असून शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा भाजपने नगरपालिका सांभाळावी अशी टीका देखील केली आहे.

You cannot copy content of this page