*💫वेंगुर्ले दि.०५-:* पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात आज वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा- नाहीतर खुर्च्या खाली करा,केंद्र सरकारचा निषेध असो,पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झाली पाहिजे,अशा घोषणा देत पेट्रोल – डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आज वेंगुर्ले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल डिझेल चे दर कमी करण्याच्या मागणी संदर्भाचे निवेदन वेंगुर्ले तहसीलदार यांना देण्यात आले.संपूर्ण देशात कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले,अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले.या चिंतेत सर्वसामान्य माणूस असताना सतत वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे.या इंधनवाढीच्या निषेधार्थ आज तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखा – वेंगुर्ले बाजारपेठ – हॉस्पिटल नाकामार्गे – तहसीलदार कार्यालय पर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे व आबा कोंडसकर,शहरप्रमुख अजित राऊळ, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे,महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले,शहर संघटक मंजुषा आरोलकर,विवेक आरोलकर,प्रकाश गडेकर, निलेश चमणकर,पं. स.सदस्य तथा माजी सभापती सुनिल मोरजकर,शामसुंदर पेडणेकर, तालुका युवासेना अधिकारी पंकज शिरसाट,विलास चिपकर,सुमन कामत,शशिकांत परब,गजानन गोलतकर,समृद्धी कुडव,रश्मी डीचोलकर,अनन्या धावडे,नम्रता बोवलेकर,सायली गावडे,मेरी फर्नांडीस, सुभाष मळकर, उमेश नाईक,सुनिल वालावलकर,आनंद बटा,शैलेश परुळेकर,दिलीप राणे,मितेश परब,नित्यानंद शेणई,आनंद बटा,शैलेश परुळेकर, दिलीप राणे,छोटू कुबल,बाळा पेडणेकर,दिगंबर पेडणेकर,अशोक नाईक यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन…
