*💫वेंगुर्ला दि.०५-:* नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व श्रमदान अंतर्गत स्वछता जनजागृती विषयावर जिल्हास्तरीय खुल्या पोस्टर स्पर्धेत वेंगुर्ल्याची कोमल भरत परब ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. हॉटेल लौकिक सभागृह वेंगुर्ला येथे ‘स्वच्छता जनजागृती‘ यावर खुल्या गटामध्ये आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन साप्ताहिक किरात च्या संपादिका सीमा मराठे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत प्रथम-कोमल भरत परब (वेंगुर्ला), द्वितीय-नम्रता दीपक निगुडकर (बांदा), तृतीय-दिया राजन पालकर (वेंगुर्ल), उत्तेजनार्थ – पूजा परमानंद चव्हाण (सावंतवाडी), विजेता भरत आईर (कुडाळ). विजेत्यांना रोख पारितोषिक, मेडल व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वेताळ प्रतिष्ठान सातत्याने विविध उपक्रम रावबवून सामाजिक भान जपत आहेच. तसेच वक्तृत्व, निबंध, चित्रकला, पोस्टर अशा विविध स्पर्धांच्या आयोजनातून स्पर्धकांना व्यासपिठ निर्माण करुन देत असल्याचे गौरवोद्गार सीमा मराठे यांनी उद्घाटन प्रसंगी काढले.यावेळी निवृत्त मुख्याध्यापक बाबली परुळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर, सचिव गुरुदास तिरोडकर, सहसचिव महेश राऊळ, विठ्ठल सोकटे, वैभवी सोकटे, संजय पाटील, अक्षता गावडे, प्रविण राऊळ, गौतम ढोले, रोहित गडेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण अनिल परुळकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.
जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेत कोमल परब प्रथम….
