शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

*💫वेंगुर्ला दि.०५-:* छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्यातर्फे शनिवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय खुल्या व शालेय गटासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता १० वी पर्यंतच्या शालेय गटासाठी ‘राष्ट्रमाता जिजाऊ यांचे अद्वितीय कार्य‘ (६ ते ८ मिनिटे) तर खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे परराष्ट्र धोरण‘ (८ ते १० मिनिटे) हा विषय ठेवण्यात आला आहे. खुल्या गटासाठी १०००, ७५०, ५०० व २५० ची दोन, चषक आणि प्रमाणपत्र तर शालेय गटासाठी ७५०, ५००, ३०० व २०० ची दोन, चषक व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संजय पाटील-९८९०६९४७०९,सुनील आळवे -९४२१६३११४७ यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page