विलवडे शाळा नं.२ टेंबवाडी प्रशालेला हार्मोनियम भेट….

*💫बांदा दि.०५-:* विलवडे टेंबवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मुंबई मंडळ, टेंबवाडीचे अध्यक्ष संजय सावंत यांनी आपली आई सुलोचना व वडील महादेव यांच्या स्मरणार्थ विलवडे शाळा नं.२ (टेंबवाडी) प्रशालेला संगीतपेटी (हार्मोनियम) भेट दिली. त्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रश्मी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, माजी उपसभापती कृष्णा सावंत, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, माजी उपसरपंच प्रकाश दळवी, सर्व पालक, टेंबवाडी व मळावाडी ग्रामस्थ व शाळेचे मुख्याध्यापक सुरेश काळे व उपशिक्षक सचिन शेळके यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page