राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींची मागणी
⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले असून, त्यांच्या विरोधात संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबतच संपूर्ण महिलावर्गाला अपमान केला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
यावेळी
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, , शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तालुका चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.
