*लोरे नं. २ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रुपेश पाचकुडे बिनविरोध*

वैभववाडी संजय शेळके
ग्रामपंचायत लोरे नं 2 च्या विद्यमान उपसरपंच सौ. शुभांगी कुडतरकर यांनी आपल्या व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेवर श्री रुपेश पाचकुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


सन्मानिय सरपंच श्री विलास नावळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेला ग्रा प सदस्य विनोद पेडणेकर, रितेश सुतार, सुप्रिया रावराणे, शुभांगी कुडतरकर, विशाखा मांडवकर, निकिता आग्रे, रुपेश पाचकुडे इ सदस्य हजर होते. यावेळी सरपंच विलास नावळे यांनी रुपेश पाचकुडे यांचा एकमेव अर्च आल्याने त्यांची निवड जाहीर केली. या ग्रामपंचायत मध्ये 9 सदस्य असून त्यापैकी सात सदस्य शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पाचकुडे यांची निवड बिनविरोध झाली.
निवड जाहीर झाल्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख श्री मंगेश लोके व शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री नाना रावराणे, सरपंच विलास नावळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्य रुपेश पाचकुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माझी जि. प. सदस्य दिव्या पाचकुडे, युवासेना तालुका समन्वयक दत्तात्रय परब, सुरेंद्र रावराणे, मीथील नाचणेकर, शुभाश कुडतरकर, अनिल नराम, देऊ मांजलकर , दिलीप मांजळकर, सुरेश नाचनेकर, माजी सरपंच महेंद्र रावराणे ई कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच विलास नावळे यांनी उपस्थित सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page