प्रवेश नव्हे तर आमची फसवणूक;आम्ही सतीश सावंत यांच्याशी एकनिष्ठ
⚡कणकवली ता.०७-:.गांधीनगर ग्रामपंचायतीचे सुनिता अनाजी सावंत,प्रसन्ना प्रशांत सावंत हे सदस्य पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतले आहेत.आमचा प्रवेश नव्हे तर आमची फसवणूकच झाली,आम्ही शिवसेना नेते सतीश सावंत यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याची प्रतिक्रिया त्या महिला सदस्यांनी दिली.तर महिलांची फसवणूक करत भाजपा नेत्यांनी केलेला प्रवेशाचा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी केला आहे.
शिवसेना नेते ,माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेला समर्थन त्या दोन महिला सदस्यांनी दिले .यावेळी गांधीनगर उपसरपंच राजेंद्र सावंत, यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत गांधीनगर उपसरपंच राजेंद्र सावंत, चेअरमन बेनी डिसोजा ,व्हाईस चेअरमन शेखर सावंत, पंचायत समिती माजी सदस्य मंगेश सावंत, बंडू ठाकूर ,संजय सावंत आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथमेश सावंत म्हणाले,गांधीनगर सरपंच व ३ सदस्य भाजपात प्रवेश केला.त्या महिलांना फसवून करत नेण्यात आले.आपण विकास कामांवर चर्चा करुयात असे सरपंच मिलिंद बोभाटे यांनी सांगितले त्या नंतर महिलांची फसवणूक करत प्रवेश केला हा प्रकार निंदनीय आहेत.आमदारकीच्या निवडणुकीत केवळ ६ मते नितेश राणे यांना होती.ती मते बोभाटे यांचीच होती.आता भरघोस निधी देणार, पैसे देतो,अशी फुस लावून नेले.दोन महिला ग्रामपंचायत सदस्य परत आले आहेत.ज्या सरपंचाला नेल ते फसवणूक केली आहे,आता सुनिता अनाजी सावंत,प्रसन्ना प्रशांत सावंत हे सदस्य शिवसेनेतच आहेत.
त्या महिला सदस्य सुनिता सावंत म्हणाल्या,आम्हाला सरपंच बोभाटे यांनी आमदार नितेश राणे यांना भेटायला जाऊ,विकास कामांवर चर्चा आहे.आम्हाला हा प्रवेश मान्य नव्हता. आम्ही सतीश सावंत यांच्या सोबत राहणार आहोत,अशी प्रतिक्रिया महिला सदस्यांनी दिली.
