⚡बांदा ता.०७-: वेळ सायंकाळची…सनईचे मंगलमय स्वर…अंगणात ग्रामस्थांची धावपळ….शुभमंगल सावधानचे भटजींचे स्वर….अंगावर पडणाऱ्या अक्षदा… फटाक्यांची होणारी आतषबाजी…अशा आनंदी वातावरणात मडुरा पंचक्रोशीत तुळशी विवाह पार पडला.
दिवाळी, पाडवा, भाऊबीजनंतर आता तुळशी विवाहाची धामधूम सुरू आहे. मडुरा पंचक्रोशीत गेले दोन रात्री घरोघरी तुळशी विवाहात लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांची लगबग पाहायला मिळाली. सायंकाळपासून ठिकठिकाणी मंगलाष्टकांचे ध्वनी ऐकू येत होते. यावेळी प्रसाद म्हणून कुरमुरे वाटण्यात आले. पुरोहितांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात तुळशी विवाह सोहळा पार पडला.
मंगलमय वातावरणात पार पडला तुळशी विवाह
