राष्ट्रवादी काँग्रेस महिलांकडून मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केले वादग्रस्त विधान; मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची केली मागणी…

⚡सावंतवाडी ता.०७-: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी महिलांच्यावतीने येथील कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान अब्दुल सत्तार यांनी केलेलं वादग्रस्त विधान हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसून त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात घ्यावा अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रेवती राणे, युवती अध्यक्ष सावली पाटकर ,शहराध्यक्ष सायली दुभाषी अध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवा टेमकर राकेश नेवगी बावतीस फर्नांडिस राकेश नेवगी नगरसेविका अफरोज राजगुरू निरीक्षक दर्शना बाबर देसाई संदीप राणे एडवोकेट संदेश राणे तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल

You cannot copy content of this page