सोनुर्ली च्या माऊली देवीच्या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बंदोबस्त चोख ठेवणार;पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.०७-: सोनुर्ली श्री.देवी माऊली जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आले असून सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आज देवस्थान कमिटीशी चर्चा करून वाहतूक नियोजनाबाबत रूपरेषा आखली जत्रोत्सवास येणाऱ्या कुठल्याही भाविकाला वाहतूक कोंडीचा सामना न व्हावा या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाईल तसेच चोख बंदोबस्त जत्रोत्सवात ठेवण्यात येईल असे स्पष्ठ केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव बुधवार नऊ नोव्हेंबरला होत आहे या जत्रोत्सवाला भाविकांची होणारी गर्दी पाहता दरवर्षी सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त तैनात करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक श्री मेंगडे यांनी आज मंदिर परिसराची पाहणी करत बंदोबस्ता संदर्भात ग्रामस्थ तसेच देवस्थान कमिटीची चर्चा केली.

You cannot copy content of this page