दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी दत्तात्रय भडकवाड

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: येथील निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांची मुंबई येथील दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर प्रतिनियुक्ती झाली.*

        श्री. भडकवाड यांची उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गातून अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली होती. महसूल व वन विभागाच्या 2 नोव्हेंबर रोजीच्या शासन आदेशानुसार त्यांची प्रतिनियुक्तीने मुंबई येथे नियुक्ती झाली.

        श्री. भडकवाड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदी असताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाचा अतिरिक्त्‍ा कार्यभार सांभाळला होता. अमृतमहोत्सव वर्षानिमित्त जिल्ह्यातील शहीद जवानांच्या माहितीपर छायाचित्रांच्या गॅलरीची निर्मिती केली. या त्यांच्या उल्लेखनीय कामाचे कौतुक प्रधान सचिव सीमा व्यास आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले होते.

0000

You cannot copy content of this page