⚡सावंतवाडी,ता.२२-: नवरंग आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून “नवरंग पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचे आयोजन २६ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यादिवशी येथील श्रीराम वाचन मंदिरासमोरील कठड्यावर पहाटे साडेपाच करण्यात आले आहे.
यावेळी गोव्याचे कलाकार सुभाष परवार हे उपस्थित राहणार आहेत. पंडित राजा काळे यांचे शिष्य असून आतापर्यंत त्यांनी गोवा आणि महाराष्ट्रात अनेक मैफिली गाजवल्या आहेत. ते या कार्यक्रमात शास्त्रीय व अभंग व नाट्यगीते सादर करणार आहे. यावेळी त्यांना हार्मोनियमची साथ निलेश मेस्त्री तर तबला साथ किशोर सावंत करणार आहेत. यावेळी जास्तीत-जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवरंगचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केले आहे.
