राधारंगची भाऊबीज’ संकल्पनेतून कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरच्या ताब्यात
⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: महिलांच्या अंगातील सुप्त क्रीडा गुणांना मार्ग करून देण्यासाठी येथील ‘राधारंग फाउंडेशनने मळगाव येथील महिलांसाठी दोन कॅरम बोर्ड प्रदान केले आहेत. राधारंगची भाऊबीज’ या संकल्पनेतून हे बोर्ड मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या बोर्डचे उदघाटन येथील सखी महिला भिशी च्या महिला सदस्य व गावातील महिलांच्या हस्ते वाचनालयाच्या सभागृहात पार पडले. यावेळी नरेश खानोलकर, संतोष सरनाईक, डॉ. अरविंद खानोलकर, वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, सचिव गुरूनाथ नार्वेकर, संचालक स्नेहा खानोलकर, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. हे कॅरम बोर्ड राधारंग चे वयोवृद्ध श्री. रघुनाथ सरनाईक यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कुटुंबियाच्यावतीने वाचनालयाला सुपूर्द केले.
