उद्योजक भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे यांच्याहस्ते झाला शुभारंभ
बांदा/प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, अंकुश माजगावकर, जे डी पाटील, प्रवीण परब, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर, अमिता परब, सुनील नातू आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत एस. आर. सावंत यांनी केले. प्रास्ताविक सुभाष मोर्ये यांनी केले. उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या देणगीतून वाचकांसाठी दरवर्षी दिवाळी अंक योजना साकारली जाते. सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले. १०० रुपये वर्गणीतून वर्षभर दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध होणार आहे.
