वीजेचा लोळ पडल्याने गाईचा मृत्यू

⚡बांदा ता.२२-: कास येथे वीजेचा लोळ गाभण गाईवर पडल्याने गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकरी योगेश भाईप यांचे ५० हजार रूपयांचे नूकसान झाले.
     गेले आठ दिवस सायंकाळच्या सत्रात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. सायंकाळी योगेश अंकूश भाईप हे गुराना चरण्यासाठी घेऊन गेले होते. अचानक पाऊस आल्याने ते घरी परतत असताना वीजेचा लोळ गाभण गाईवर पडला व त्यातच गाईचा मृत्यू झाला. यात योगेश भाईप यांचे सुमारे ५० हजार रूपयाचे नूकसान झाले. मृत गाईचे शवविच्छेदन करण्यात आले. तलाठी व्ही. एस. कविटकर यांनी पंचनामा केला.

You cannot copy content of this page