विशाल सेवा फाऊंडेशनची स्थापना

१५ वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक सेवेनंतर घेतला निर्णय;रखडलेल्या प्रकल्पांना देणार दिशा:विशाल परब यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.२२-: गेले १५ वर्षे विशाल परब यांच्या माध्यमातून सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना आता मी याच विशाल परब मित्रमंडळीच रूपांतर विशाल सेवा फाऊंडेशन करत आहे अशी माहिती भाजप युवा नेता विशाल परब यांनी दिली. दरम्यान विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून जे प्रकल्प रखडले ते देखिल विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी परब म्हणाले ते सावंतवाडी येथील शिल्पाग्राम येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी दादा साईल,प्रसन्न देसाई,विनायक राणें आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page