सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना विमा योजनेतून धनादेश सुपूर्द

⚡मालवण ता.२२-: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कै. शंकर सखाराम फोंडबा यांचे दि. १२ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले होते. निधनाचे वृत्त समजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मालवण शहर शाखेकडून फोंडबा यांचा विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होऊन रुपये २ लाख रक्कमेचा धनादेश मालवण शहर शाखेतर्फे देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा बँक संचालक व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, तसेच तालूका विकास अधिकारी सरमळकर, श्री.गवंडी, श्री. केळूसकर, शाखाव्यवस्थापक श्री. गोसावी, श्री. साळसकर हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page