⚡मालवण ता.१९-: पेंडूर सहकारी सोसायटीचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्त्या दीपा सावंत यांनी येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला साऊंड सिस्टिमसाठी लागणारा मिक्सर भेट दिला. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, श्याम पावसकर, सुधीर वराडकर, शेखर पेणकर, संजय नाईक, देवयानी गावडे, अमित सावंत, बिपिन सावंत आदी उपस्थित होते. भेटवस्तू दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, अॅड. एस. एस. पवार यांनी आभार मानले.
कट्टा वराडकर हायस्कूलला साऊंड सिस्टिम मिक्सर भेट
