⚡मालवण ता.१९-: मालवण वायरी येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा मेळावा २० ऑक्टोबर रोजी वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची कॅबिनेट बैठक आयोजित केल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच जाहीर करून करण्यात येणार आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी आणि मालवणवासियांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महेश राणे यांनी आचरा येथे केले.
वायरी येथील शिंदे गट शिवसेनेचा मेळावा पुढे ढकलला
